एजिवडे गावातील कांबळे कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने अखेर मार्गी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एजिवडे गावातील कांबळे कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने अखेर मार्गी लागले आहे. चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला. कांबळे कुटुंबाचे, वन विभागाच्या सहकार्याने यशस्वी पुनर्वसन करण्यात आले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली कि, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एजिवडे हे २५० कुटुंबांचे गाव आहे. राज्य शासनाने २०१३ रोजी स्वेच्छा पुनर्वसन योजना घोषित केली आणि गावातील सर्वांनी स्वेच्छा पुनर्वसनाचा निर्णय घेतला. मात्र या पुनर्वसनादरम्यान मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कृष्णा कांबळे कुटुंब बाहेर उपेक्षित राहिलं व आपली वयोवृद्ध आई, दिव्यांग परंतु उच्चशिक्षित पत्नी छाया (M.A In Economics ) दोन मुलांसह त्या जंगलात जीव मुठीत धरून राहत होते. दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी त्यांच्या हाता तोंडाला आलेल्या मोठ्या मुलाचा शासकीय अनास्थेने बळी घेतला, असल्याचे पाटील यांनी सांगितले.
आपले पुनर्वसन व्हावे; यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे कुटुंब शासकीय कार्यालयांचे खेटे मारत होते. कांबळे कुटुंबाची विदीर्ण कथा चंद्रकांत पाटील यांना समजताच तातडीने त्यांनी आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून हा विषय मार्गी लावत, आता कांबळे कुटुंबाचे यशस्वी पुनर्वसन केले आहे.