उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कांडगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध मंजूर विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

13

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे मागील दोन दिवसांपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कांडगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध मंजूर विकास कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान कांडगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध मंजूर विकास कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन केले. गावच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत तसेच विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोल्हापूर दौऱ्यादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील आकुर्डी येथील श्री त्रिमूर्ती सहकारी दूध संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेने आपली वाटचाल अशीच पुढे सुरु ठेवून ग्रामीण भागातील जनतेचे कल्याण करावे, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच कोल्हापुरातील भाजपा बूथ प्रमुखांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून बूथ सशक्तीकरणावर सर्वांनी भर देण्याची सूचना केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.