कसबा भागातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार,कुणाल शैलेश टिळक यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई : पुण्यातील कसबा विधासभेच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांनी मध्यवस्तीतील विकासाला अडथळा ठरणाऱ्या बांधकाम नियमावलीत बदल करण्याचा मुद्दा वारंवार शासन दरबारी उपस्थित केला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते कुणाल टिळक यांनी याच प्रलंबित प्रश्नासंदर्भात नुकतीच राज्याचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत शैलेश टिळक देखील उपस्थित होते.

कसबा मतदार संघात अनेक वाडे आणि जुन्या इमारती आहेत, आज अनेक इमारती – वाड्यांचा पुनर्विकास करायचा झाल्यास नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. स्व. आमदार मुक्ता टिळक यांच्या द्वारे उपस्थित केलेल्या या प्रश्नाचा पाठपुरावा कुणाल टिळक करत आहेत. उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या संदर्भात लवकरच निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन टिळक यांना दिले आहे. ह्या निर्णयामुळे मध्यवस्तीतील शेकडो इमारतींच्या विकासनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.