भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अमरावती मध्ये राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पर्धेच्या तयारीचा घेतला आढावा

अमरावती : भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अमरावती मध्ये गुरुकुलम् बहुउद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा अथलेटिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली.