संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा सभागृहाचे नामकरण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

21

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा सभागृहाचे नामकरण डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख करण्यात आले असून, शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी विद्यापीठातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

प्रशस्त वातानुकुलित हॉल, अद्ययावत साऊंड सिस्टीम, बैठक व्यवस्था तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज असे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह आहे. अधिसभा सभागृहाला भारताचे कृषीमंत्री, शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचविणारे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव विद्यापीठ अधिसभेत सदस्य डॉ. रविंद्र मुंद्रे यांनी मांडला होता. त्यांचा ठराव सर्वानुमते सभागृहाने मान्य करण्यात आला.
खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.