पुस्तक महोत्सव पुण्यात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

8

पुणे : वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासा (नॅशनल बुक ट्रस्ट) पुणे पुस्तक महोत्सवाच्या रुपाने वाचन संस्कृतीच्या कुंभमेळ्याचे आयोजन डिसेंबर महिन्यात करण्यात आले होते. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादात हा मेळावा संपन्न झाला. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी हजारो हात रात्रंदिवस झटत होते. या सर्व श्रमसेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सस्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, यावेळी नॅशनल बुक ट्रस्टचे युवराज मलिक यांनी पुण्याला पुस्तकांची राजधानी बनविण्याची संकल्पना मांडली. त्यांची ही संकल्पना सर्वांनीच उचलून धरली, तसेच पुढील वर्षी देखील यापेक्षा भव्यदिव्य पुस्तक महोत्सव पुण्यात करण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी सर्व पुणेकरांच्या वतीने याप्रसंगी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.