समाजाला योग्य दिशा देण्याची आणि संस्कारांची परंपरा जपण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ब्राह्मण समाजाने सातत्याने पार पाडली – मंत्री चंद्रकांत पाटील

5

पुणे : पुणे येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित ब्राह्मण मेळाव्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंदक्रांत पाटील यांनी उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधला व सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पाटील म्हणाले, भारतीय संस्कृती, शिक्षण, अध्यात्म, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात ब्राह्मण समाजाचे योगदान नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. समाजाला योग्य दिशा देण्याची आणि संस्कारांची परंपरा जपण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ब्राह्मण समाजाने सातत्याने पार पाडली आहे. ही परंपरा आणि समाजहिताचे कार्य निरंतर सुरू राहावे, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

या प्रसंगी महंत सुधीर दास, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, आ. भीमराव तापकीर, प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, पंचांगकर्ते मोहन दाते, प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, महेश चिटणीस, मंदार रेडे यांच्यासह इतर मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.