पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ब्रह्मोद्योग फाऊंडेशनच्या विद्यमाने ब्रह्मोद्योग स्टार्ट अप कॉन्क्लेव्हचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, ब्रह्मोद्योग स्टार्ट अप कॉन्क्लेव्ह हा ब्राह्मण उद्योजक घडवण्याच्या दृष्टीने अत्यंत अभिनव आणि स्तुत्य उपक्रम आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देखील स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून नवउद्योजकांना सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे अशा परिसंवादाच्या माध्यमातून नवउद्योजक तरुण-तरुणींना प्रेरणा मिळेल. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ब्राह्मण समाजासाठी अमृत महामंडळ निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले होते. परंतु, मधल्या कालावधीत हे काम ठप्प झाले. पण,आता पुन्हा सरकार आल्यापासून देवेंद्रजींनी या कामाला गती दिली आहे. त्यामुळे लवकरच अमृत महामंडळ निर्माण होऊन त्याचा ब्राह्मण समाजाला नक्की लाभ मिळेल, असा विश्वास याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, सत्यजीत कुलकर्णी, लक्ष्मीकांत धडफळे, पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, चितळे समुहाचे गिरीश चितळे, चैतन्य केमिकलचे प्रसन्न देशपांडे, संतोष जोशी, घनश्याम दुबे यांच्या सह इतर मान्यवर आणि ब्राह्मण समाजाचे आदी बांधव उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.