केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाने पुण्यातून मोठ्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्याचा मार्ग होणार मोकळा… चंद्रकांत पाटलांनी मोहोळ यांचे मानले आभार

पुणे : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या बहुप्रतिक्षित ओएलएस सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिली. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोहोळ यांचे आभार मानले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांमुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या बहुप्रतिक्षित ओएलएस सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने आज मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे पुण्यातून मोठ्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हि बाब अत्यंत आनंददायी आहे. पुण्यातील पायभूत सुविधांचे जाळे मजबूत केल्याबद्दल पाटील यांनी मोहोळ यांना मनःपूर्वक धन्यवाद देत तमाम पुणेकरांचे अभिनंदन केले.
पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. संरक्षण मंत्रालयाने ओएलएस सर्वेक्षण करणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे पुण्यातून मोठ्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना याबाबत पत्र लिहिले होते. तसेच त्यांची भेट देखील घेतली होती. यासोबतच मुख्य सचिवांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ओएलएस सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली.