अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे भीषण अपघातातील या जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट

3

अमरावती : काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातातील जखमींवर अमरावती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती दौऱ्या दरम्यान अपघातातील या जखमींची भेट घेतली.  यावेळी आमदार रवी राणा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यवतमाळ मार्गावर नांदगाव खंडेश्‍वर नजीक शिंगणापूर येथे सिमेंट कॉंक्रिट मिक्‍सर ट्रकने टेम्‍पो ट्रॅव्‍हलरला धडक दिल्‍याने भीषण अपघातात  झाला. याअपघातात चार तरूणांचा जागीच मृत्‍यू झाला, तर १० जण गंभीररीत्‍या जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी घडला. जखमींवर येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय आणि खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांनी जखमींची भेट घेऊन , त्यांच्याशी हितगुज करून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा याप्रसंगी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.