कार्टून्स कट्टा ‘ महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप पुणे, मार्फत सोलापूरचे व्यंगचित्रकार श्री. उन्मेष शहाणे यांचा श्री. अमितजी ठाकरे यांच्या हस्ते सत्कार !

5

विविध वृत्तपत्रे, मासिके तसेच अन्य सोशल मीडियावर आपली व्यंगचित्रे प्रसिद्ध करणाऱ्या काही निवडक दहा चित्रकारांचा शनिवारी दिनांक ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता मनसे नेते श्री. अमितजी ठाकरे यांच्या हस्ते, हा सोहळा पार पडणार आहे.यात सोलापूरचे व्यंगचित्रकार श्री. उन्मेष शहाणे यांचा समावेश आहे.

व्यंगचित्रकार आपल्या चित्रातून समजातील दोषावर तसेच समाज व्यवस्थेवर बोट ठेवत असतो, अशा काही निवडक व्यंगचित्रकारांच्या कार्याचा कौतुक सोहळा कार्टून्स कट्टा पुणे यांचे मार्फत बालगंधर्व कला दालन येथे आयोजित करण्यात आल्याचे ‘ बोलक्या रेषा’ कार प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री. घनश्याम देशमुख यांनी सांगितले.या कार्यक्रमास प्रसिद्ध शिल्पकार श्री. प्रमोद जी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दिनांक ४ ते ६ मे रोज सकाळी ११ ते ८ दरम्यान या तीन दिवसीय कार्यक्रमात कार्यशाळा, आणि श्री. घनश्याम देशमुख यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शनाचा लाभ कला रसिकांना मिळणार आहे. याप्रसंगी छोट्यासाठी चित्र कसे रेखाटावे याचे प्रात्यक्षिक, कला साहित्यासह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना अगदी मोफत असणार आहे. सोबत सर्वाँना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तरी दिनांक ४ ते ६ या तीन दिवसीय संपूर्ण कला सोहळ्याचा आणि सुमारे ३०० चित्र प्रदर्शनाचा आस्वाद सर्व कलाकारांनी तसेच कला रसिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक श्री. घनश्याम देशमुख यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.