सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुरात जानेवारी महिन्यात १०० व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने पाटील यांनी संमेलनाचा स्वागताध्यक्ष नात्याने सोलापूर मधील प्रथितयश उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला.
अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुर येथे जानेवारीत शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मानधनातून दोन लाख ५१ हजार रुपये देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार याचा धनादेश अखिल भारतीय उपनगरीय शाखेचे अध्यक्ष तथा नाट्यपरिषद मुंबईचे कार्यकारणी सदस्य विजय दादा साळुंके यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संमेलनाचा स्वागताध्यक्ष नात्याने सोलापूर मधील प्रथितयश उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. सोलापूरच्या वैभवाला साजेसे विभागीय नाट्य संमेलन आपल्या सर्वांना करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी भावना या कार्यक्रमात पाटील यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आ. सुभाष देशमुख, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ माने यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.