पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज सुपरस्पेशालिटी येथील कॅथलॅबचे लोकार्पण

38

अमरावती : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अमरावतीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या निधी अंतर्गत विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे नव्याने उभारलेल्या कॅथलॅबचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. . दरम्यान, अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असलेल्या नूतन कॅथलॅबची पाहणी करून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधला. सुपरस्पेशालिटी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कॅथलॅबमुळे विभागातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना हृदयरोगासंबंधीच्या आजारावर उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. नवीन उपचार सेवा-सुविधा कार्यान्वित होत असताना त्या नियमितपणे सुरु राहाव्यातयाची जाणीवपूर्वक खबरदारी घ्यावीअशा सूचना देखील चंद्रकांत पाटील यांनी आज रुग्णालय प्रशासनाला दिल्या .

चंद्रकांत पाटील म्हणाले कीकोविड महामारीच्या संकटाने आरोग्य सेवा-सुविधांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कॅथलॅब व इतर वैद्यकीय उपचार सुविधा उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे 4 कोटी 21 लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून कॅथलॅब उभारण्यात आली आहे. या लॅबच्या माध्यमातून 80 रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. समाजातील गोरगरीबसर्वसामान्य रुग्णांसाठी पुरेश्या खाटा व इतर वैद्यकीय सेवा-सुविधाउपचार यंत्र-साहित्य रुग्णालयास हवे असल्यास त्यांनी मागणीचा प्रस्ताव सादर करावा. त्यास तात्काळ मंजूरी देऊन साहित्य उपलब्ध करुन दिल्या जाईलअसे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले कीगोरगरीबसर्वसामान्य रुग्णांना मोठ्या आजारांवर मोफत उपचार सुविधा उपलब्ध व्हावीयासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार खर्चाची मर्यादा वाढवून पाच लाख पर्यंत करण्यात आली आहे. या योजनेतून पाच लाखापर्यंत खर्च येणाऱ्या मोठ्या आजारांसाठी उपचार सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. या योजनेचा जनतेनी लाभ घ्यावा. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवाऱ्याची व भोजनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. तसेच निम्म्या किंमतीत जीवनाश्यक वस्तू उपलब्ध होतीलयादृष्टीने एखादे फिरते वितरण केंद्र सारखा उपक्रम राबविण्यात यावा. यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घ्यावाअशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी रुग्णालय प्रशासनाला केल्या. जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाही भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल. डॉक्टरांनीही आरोग्यसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून रुग्णांना मनापासून औषधोपचार सेवा-सुविधा पुरवाव्यातअसे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

खासदार डॉ. अनिल बोंडेआमदार प्रविण पोटे-पाटीलआमदार किरण सरनाईकविभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेयपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळेवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटेडॉ. मंगेश मेंढेडॉ. अविनाश चौधरीपदाधिकारी तुषार भारतीयनिवेदिता दिघडे यांच्यासह सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे वैद्यकीय अधिकारीअधिपरीचारिका व आरोग्य कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.