मुंबई : महाराष्ट्रासाठी केलेल्या घोषणांचा पाऊस झाला खरा.. पण यातील किती योजना अंमलात येतील यावर शंका आहे. हा अर्थसंकल्पातून शुद्ध ‘पोलिटिकल हिप्नॉटिझम’ चा प्रकार जास्ती असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. दानवे म्हणाले कि, अर्थसंकल्पीय भाषण ऐकून मला पक्का विश्वास बसला आहे की हे सरकार मराठवाड्याला, विदर्भाला महाराष्ट्राचा भाग मानत नाही. पर्यटन, पायभूत सुविधा, वैद्यकीय सेवा आदी गोष्टींतून मराठवाडा,विदर्भ या सरकारने बाद ठरवला आहे. ‘सुसूत्रता’ आणायच्या नावाखाली स्थापन केलेल्या समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून जबर कर लादण्याचा सरकारचा छुपा मनसुबा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेने ओळखून घ्यावे, असे दानवे म्हणाले.
अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात राज्य शासनाने अनेक मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहे.शेती व शेतकऱ्यांसाठी भरीव अशी कोणतेही तरतूद यामध्ये केलेली नसल्याचे दानवे म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि, मराठवाड्याच्या विकासासाठी कसहीली तरतूद न केल्याने मराठवाडा विरोधी हे सरकार असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे.राज्यावर कर्ज वाढवायला लावणारा हा अर्थसंकल्प असून शाश्वत असे कोणतेही काम यातून घडणार नाही.लोकसभेत झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये होऊ नये यासाठी केलेला हा सर्व खटाटोप असल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला.
Get real time updates directly on you device, subscribe now.