चंद्रकांत पाटील यांनी जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲंड टेक्नाॅलाॅजी या संस्थेस सदिच्छा भेट देऊन प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी साधला संवाद
यवतमाळ : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी यवतमाळ मधील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲंड टेक्नाॅलाॅजी या संस्थेस सदिच्छा भेट देऊन प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत आज महाराष्ट्र आघाडीवर आहे. मुलींच्या शिक्षणाला शासनाचे प्राधान्य असून त्यासाठी शासनाने व्यवसायिक शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी काळात मुलींना उच्च शिक्षण घेणे अजून सोपे होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे प्रमुख विजय दर्डाजी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी साधलेल्या संवादानंतर विद्यार्थ्यांनी, प्राध्यपकांनी आणि प्राचार्यानी निवडलेल्या सकारात्मक प्रगतिशील मार्गाला, या संवादातून आणखी गती मिळेल आणि राष्ट्र निर्मितीत मोलाचे योगदान होईल अशी मला खात्री असल्याचे विजय दर्डा म्हणाले.