‘उपमुख्यमंत्री चषक क्रिकेट’ स्पर्धेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : महाराष्ट्र माझा सेवा संस्था’ आणि ‘युनियन क्रिकेट क्लब’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘ठाणे प्रीमियर लीग’ म्हणजेच ‘उपमुख्यमंत्री चषक क्रिकेट’ स्पर्धेचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेतून स्थानिक क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो.
यावेळी शिंदे यांनी स्टंम्प्सला पुष्पहार अर्पण करून पहिल्या सामन्यासाठी नाणेफेकही केली. त्यांनतर त्यांनी हातात बॅट घेऊन चौफेर फटकेबाजी करत फलंदाजी करण्याचा आनंद लुटला.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक आणि स्पर्धेचे आयोजक विकास रेपाळे, माजी नगरसेविका सौ.नम्रता भोसले-जाधव तसेच शिवसेना पदाधिकारी आणि स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू, क्रिकेट रसिक ठाणेकर उपस्थित होते.