हादगा, भोंडला आणि भुलाबाई या कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता, संस्कार आणि संस्कृतीची परंपरा अधिक बळकट – स्नेहा रणजित कलाटे

पिंपरी -चिंचवड : हातगा, भोंडला आणि भुलाबाई हे महाराष्ट्रातील कुमारिकांचे अश्विन महिन्यातील लोकउत्सव आहेत, ज्यात मुली पारंपरिक गाणी गाऊन, नृत्य करून पार्वती-महादेवाची पूजा करतात आणि भावी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात. अनेक गीते गाऊन फेर धरतात. ही गीते त्यांच्या भावना, नातेसंबंध आणि भावी वैवाहिक जीवनाचे संकेत देतात. हा उत्सव मुलींना एकत्र आणतो. मात्र काळानुसार आपल्या संस्कृतीत झपाट्याने बदल होत आहेत. चांगल्या गोष्टी झपाट्याने लोप पावत आहेत. पण अजूनही काही ठिकाणी हा खेळ आनंदाने खेळला जातो. राष्ट्र सेविका समिती वाकड यांच्या अहिल्या, नारायणी व विदूला शाखांच्या संयुक्त विद्यमाने भव्य हातगा भोंडला–भुलाबाई कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर व आनंदी वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या कार्क्रमाला रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा, तसेच राष्ट्र सेविका समितीच्या अध्यक्षा सौ. स्नेहा रणजित कलाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सुंदर प्रसंगी स्नेहा रणजित कलाटे यांनी उपस्थित राहून महिलांच्या स्नेहबंधाचा आणि परंपरेच्या या उत्सवाचा साक्षीदार होण्याचा आनंद घेतला. अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता, संस्कार आणि संस्कृतीची परंपरा अधिक बळकट होते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्र सेविका समिती वाकड यांच्या अहिल्या, नारायणी व विदूला शाखांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत भव्य हातगा भोंडला–भुलाबाई कार्यक्रम अत्यंत सुंदर व आनंदी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात सर्व उपस्थित महिलांनी फेर धरून गाणी म्हटली, उखाण्यांनी रंगत वाढवली, आणि शेवटी तिन श्लोक व अष्टभुजा स्तोत्र म्हणत कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर खिरापत, दूध आणि स्वादिष्ट जेवण घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.