‘कमवा आणि शिका’ योजनेची व्याप्ती वाढवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थिनींनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुढे जाण्याची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू – मंत्री चंद्रकांत पाटील

12

कोल्हापूर : कोल्हापूर येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनमोकळा संवाद साधला. शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची आणि घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय असो किंवा प्राध्यापक भरतीचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय असो, शिक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी महायुती सरकार सातत्याने काम करत आहे. तसेच ‘कमवा आणि शिका’ योजनेची व्याप्ती वाढवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थिनींनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुढे जाण्याची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी भाजपाचे नेते शेखर इनामदार, संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, भाजपा नेते राहुल चिकोडे यांच्यासह संस्थेतील मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.