आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत एनएचएआय व पिंपरी-चिंचवड मनपा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

20

पिंपरी चिंचवड :

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित पायाभूत विकासकामांना गती देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( एनएचएआय) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी महामार्ग व लगतच्या सर्व्हिस रस्त्यांबाबत नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी दिली.

या बैठकीत प्रामुख्याने महामार्गालगतच्या ड्रेनेज व पाणी लाईनची शिल्लक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. सोबतच सुमारे १ किलोमीटर अंतराची ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम लवकर पूर्ण करणे तसेच मनपाच्या पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाने आवश्यक तांत्रिक मदत उपलब्ध करून देणे याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली. ताथवडे अंडरपासमधील पाण्याचा उगम शोधून गळती थांबवण्याचे काम, समीर लॉन्स अंडरपासकडे जाणाऱ्या सर्विस रोडवरील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्याबाबतही चर्चा यावेळी झाली. महामार्गाच्या पुश-बॅक कामासाठी आदरणीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून पाठपुरावा करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. येणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संबंधित प्रश्न समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय हि यावेळी घेण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.