राष्ट्रवादी युवकांची ‘वर्षा’ वर धडक, प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी

1

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनियुक्त युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व कार्याध्यक्ष रविकान्त वर्पे व सुरज चव्हाण यांनी पहिल्याच दिवशी युवक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक देत प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

एमपी मिल कंपाउड एसआरए प्रकरणात भ्रष्टाचार केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी हा राजीनामा मागितला आहे. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी प्रकाश मेहता हाय… हाय… भाजप सरकार चोर हैं, भाजप सरकार हाय… हाय… अशी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.