महाप्रलया मुळे पुण्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सुट्ट्या रद्द -जिल्हाधिकारी
पुणे : कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नागरीकांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय विभागांची कार्यालये पूर परिस्थितीच्या निवारणासाठी दि 10, 11 व 12 ऑगस्टला शासकीय सुट्टी असली तरी कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश पुण्याचे जिल्हा
धिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत .शिवाय पूरग्रस्तांना सध्या बाटलीबंद पाणी, मेणबत्ती-काडीपेटी, सुके खाद्यपदार्थ आणि कपड्यांची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी या वस्तू पुणे रल्वे स्थानका जवळील विभागीय आयुक्त कार्यालयातील (कौन्सिल हॉल) मदत कक्षात द्याव्यात. नागरिकांनी मदत म्हणून जुने कपडे देऊ नयेत. द्यायचे असल्यास नवीन कपडेच द्यावेत असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
पुरग्रस्थनांसाठी या वस्तू मदत म्हणून स्वीकारणार…
बिस्कीट, न्यूडल्स, चहा पावडर, टूथपेस्ट-ब्रश, साबण, पाण्याच्या बाटल्या, मेणबत्ती, काडेपेटी, टॉर्च, ब्लँकेट, सतरंजी, टॉवेल, साडी, लहानमुलांची कपडे, मोठ्या माणसांची कपडे आणि आंतरवस्त्र. नागरिकांनी दिलेले जुने कपडे स्वीकारण्यात येणार नाहीत. कपडे द्यायचे असल्यास नवीन देण्यात यावेत, असे आवहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. वेदनाशामक, ताप-सर्दी-खोकला आणि व्हेपोरब ही औषधे स्वीकारले जातील. तर,रोख रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता फंडाला देण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.