IAS अधिकाऱ्यांच्या पत्नीही नाहीत मागे, मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

संपूर्ण देश आणि महाराष्ट्रराज्य आज कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहेत, मंत्रालयातील अधिकारी ते ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, पोलीस प्रशासन, आरोग्य सेवक सर्वजण अविरत प्रयत्न करून सामान्य जनेतची सेवा करत आहेत. अनेक उद्योजक, सिनेकलाकार, व्यावसायिक, सामाजिक संस्था ते सामान्य नागरिक आज कोणत्या न कोणत्या मार्गाने मदत कार्यात हातभार लावत आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या मदत कार्यात आता राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या पत्नींही मागे नाहीत.
आज ‘दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’ या संघटनेच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड १९ साठी १ लाख ७५ हजार ८११ रुपयांची मदत देण्यात आली आहे. मुख्मंत्री उद्धव ठाकरे, मुख्यसचिव अजोय मेहता, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आला.