मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेले स्वच्छ्ता अभियान ही मोदीजींनीच सातत्यपूर्णतेने लोकांची सवय बनवली…. अभियानाच्या बाबतीत चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

15

मुंबई : भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेले स्वच्छ्ता अभियान ही मोदीजींनीच सातत्यपूर्णतेने लोकांची सवय बनवली आहे. याच आदर्शाचे पालन करून स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मोदीजी एखादी गोष्ट घोषित करून न थांबता त्याला यशाच्या शिक्षणावर नेणे हे त्यांना खूप चांगलं जमत. त्यांनी करोडो लोकांना या स्वच्छता अभियानात जोडलं. १० वर्षांपूर्वी हा सेवा पंधरवडा , स्वछता पंधरवडा सुरु झाला, हे अभियान पूर्ण यशस्वी झालं. या अभियानामुळे ऑफिसेस स्वच्छ झाली, गाव स्वच्छ झाली, अनेक कॉलनी स्वच्छ झाली. या अभियानामुळे स्वच्छता स्पर्धा देखील राबविण्यास सुरुवात झाली. हे अभियान मोदीजींनी पूर्ण यशस्वी केले. त्यामुळे स्वछता राखण हा आपला स्थायी भाव आहे, असे पाटील म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले, या अभियानामुळे स्वचतेचे प्रमाण वाढले, घर स्वच्छ करण्यात आले, कॉलोनी स्वच्छ करण्यात आला, घाण पाणी साचण्याचे प्रमाण हळूहळू कमी झाले. त्यामुळे आजारपण वाढण्याचं प्रमाण कमी झालं. पोटाचे आजार कमी झाले. वैयक्तिक स्वच्छता वाढली. स्वच्छतेतून समृद्धी हे मोदींनी सांगितले, त्याबाबत बोलताना पाटील म्हणाले कि, आपल्याकडे विदेशी लोक येत असतात, ते आपल्या देशातील घाणीबद्दल बोलत असतात. भारताकडे घाण करणारा देश म्हणून बघितलं जायचं ती प्रतिमा या अभियानामुळे आता बदलली. स्वच्छतेचा मोठा पैलू असा आहे, ओला कचरा, सुका कचरा वेगळा होऊन त्यातून खत निर्मिती, सांडपाण्याचा वापर कसा चांगल्या कामासाठी केला जातो याचा विचार झाला.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघात कोथरूडमध्ये कचरा वाहतुकीच्या गाड्या सुरु केल्या. गटार चोकअप काढण्याच्या गाड्या सुरु केल्या. महाराष्ट्रात वारिच्यावेळी अनेक सुविधा केल्या.पालखीमार्गात टॉयलेट्स उपलब्ध करून देणे हे देखील सुरु केले. वारीमध्ये फिरता दवाखाना देण्यात आला होता. अनेक लोकांनी त्या सेवेचा उपयोग करून घेतला. या सुविधा मी अगदी मोफत करून दिल्या, अशी माहिती यावेळी पाटील यांनी दिली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.