आता तरी सुधरा! रोहित पवार यांचा भाजपला टोला
देशासह राज्य एकजुटीने कोरानाचा सामना करत असताना, भाजप नेते अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे सामान्य जनतेच्या प्रक्षोभाला सामोरे जात आहेत, मग तो CSR चा विषय असो, वा PM फंडासाठी केलेली मदत असो. त्यातच न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद मिळू नये यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून त्यात आणखी भर पडली आहे.
या सर्वच गोष्टीच्या पार्श्वभूमीवर विरोधाकांचा समाचार कर्जत – जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून घेतला आहे.
आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणतात
राज्य कोरोनाशी लढतंय अन भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय. त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून कोर्टात जातात. पण कोर्टानेच स्वप्नभंग केल्याने आता तरी सुधरा!
आज एकिकडं भाजपचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता अशी स्थिती आहे.