मास्क घालण्यास सांगितले म्हणून, शीख व्यक्तीवर तरुणांचा हल्ला

3

मुंबईच्या चेंबूरमध्ये इंदरसिंग नावाच्या शीख व्यक्तीवर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. सार्वजनिक ठिकाणीमास्क घालायला सांगितले, म्हणून हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. इंदरसिंग यांना गंभीर इजा झाली असून जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चेंबूर येथील लोकमान्यनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ४ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.