अखेर.. अभिनेत्री प्रार्थना बेहरेला, वडोदरा ते मुंबई प्रवासाची परवानगी

12


आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहरे लवकरच मुंबई मध्ये परतणार आहे, परिवाराला भेटायला गेलेली प्रार्थना, वडोदरा येथेच लॉकडाऊनमुळे अडकून होती, आता ती लवकरच मुंबईत पोहोचणार आहे..बाय रोड एका गाडीतून प्रार्थनाला प्रवासाची परवानगी मिळाली आहे, आता तुम्ही म्हणाल प्रार्थनाला प्रवासाची परवानगी कशी मिळाली ? आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागल्या ? या बाबत ती स्वतः माहिती देणार असल्याचे तीने फेसबुक व्हिडीओ मध्ये सांगितले आहे..

सध्या वडोदरा हा गुजरातच्या रेड झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यांमधील एक आहे. आज पर्यंत वडोदरा येथे ४४१ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून, त्यातील १५८ रुग्ण बरे झाले आहेत आणि २५२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आज पर्यंत वडोदरा येथे कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला आहे..

फोटो: भरत पवार