व्हिडीओ, प्रार्थना आणि प्रश्न काही…

15 537

लॉकडाऊन मुळे आईच्या घरी अडकून पडलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने वडोदरा ते मुंबई प्रवास करत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्या व्हिडीओ मध्ये तीने मुंबईला लवकरच पोहोचणार असल्याचा आनंद व्यक्त करत, तीला प्रवासाची परवानगी कशी मिळाली आणि त्यासाठी काय करावे लागले याची माहिती लवकरच देणार असल्याचे स्वतः सांगितले.. खरतर प्रार्थनाला हि परवानगी कशी मिळाली असेल हा प्रश्न सर्वांना त्याचवेळी पडला होता..

पोहोचल्यावर दि. ७ मे रोजी प्रार्थनाने आपल्या पती सोबतचा एक फोटो शेअर करत, तब्बल ५० दिवसांनी पतीला भेटल्याचे समाधान व्यक्त केले.

पण सर्वांना पडलेला मूळ प्रश्न तसाच राहिला..एकीकडे सामान्य माणूस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि देशातील वेगवेगळ्या राज्यात अडकून पडला आहे, शहरात पण आज अनेक ठिकाणी जाण्यास – येण्यास बंधने आहेत , असे असताना गुजरात मधील रेड झोन मध्ये असलेल्या वडोदरा येथून कोणत्या अत्यावश्यक कारणासाठी प्रार्थनाला परवानी प्रशासनाने दिली असेल ?

आज दि. ९ मे पर्यंत वडोदरा येथे कोरोनाचे ५०० रुग्ण आढळले असून त्यातील ३१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १९८ बरे झाले असून २७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सामान्य माणसाला आणि सेलेब्रिटींना वेगळा न्याय का ? असे सवाल सोशल मिडीयावर विचारण्यात येत आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरेने सांगितल्या प्रमाणे परवानगी मिळाली कशी ? याचा खुलासा करणे गरजेचे आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.