…आम्ही हिंदू म्हणून रोखता? तुम्ही हिरवा रंग धारण करा; सोमय्यांचा ठाकरे सरकारला चिमटा
कऱ्हाड: माजी खासदार व भाजपाचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूरला जात असताना कऱ्हाड येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. काल मुंबईत त्यांना पोलिसांनी डांबून ठेवले, त्यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावरून सरकारवर टीका करताना सोमय्या म्हणालेत ‘मला विसर्जनापासून, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखता! आम्ही हिंदू म्हणून रोखता? तुम्ही भगवा सोडा, हिरवा धारण करा. उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा चालणार नाही. आम्ही हायकोर्टात जाणार, चुकीच्या आदेश देणाऱ्या मुंबई पोलिसांवर कारवाई व्हावी, मुंबई पोलिस कमिशनरवर कारवाई व्हावी.’
सोमय्या मंत्री हसन मुश्रीफयांच्याविरुद्धच्या घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी आज कोल्हापूरला जाणार होते. यावरून सोमय्या यांनी ठाकरे सरकारला टोमणा मारला ‘ठाकरे सरकारने इतिहास रचला, घोटाळेबाजांऐवजी घोटाळे उघड करणाऱ्यांना अटक करता! मला गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना विचारायचे आहे, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखल?’
सुरक्षा काढली !
ठाकरे सरकारने माजी सुरक्षा काढून घेतली, असा आरोप सोमय्यांनी केला. मोदी सरकारने मला संरक्षण दिले, त्याच्याशीही तुमची गद्दारी! तुमच्याकडे माहिती आली गनिमी काव्याने किरीट सोमय्यांवर हल्ला होऊ शकतो, ही माहिती तुम्ही सुरक्षा यंत्रणांशी का शेअर केली नाही, असा प्रश्न सोमय्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांची दडपशाही, आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने सगळं होतंय
“हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या दडपशाहीमुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने होत आहे, आमचं चॅलेंज त्यांना आहे. माझी पहिली हरकत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आहे. पहिली जबाबदारी गृहमंत्री वळसे पाटील यांची आहे.”
“ठाकरे सरकार कितीवेळा दडपशाही करणार? हसन मुश्रीफांच्या घोटाळ्याविरोधात कागल पोलीस स्टेशनमध्ये जात होतो. सरसेनापती कारखाना त्या हद्दीत येतो. मी तक्रार केल्यानंतर ७ दिवसात कोर्टात जाऊ शकतो. मी अंबाबाईचं दर्शन घेणार हे तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. अंबाबाईचं दर्शन बाहेरुन करणार होतो.”, असंही सोमय्या म्हणाले.