अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात गुन्हा दाखल; पत्नीकडून मारहाणीचे आरोप

पुणे: प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आई व वडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाण ने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या पत्नी स्नेहा चव्हाण हिने पती, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या पोलिस तक्रारीने मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षाच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठं होईल. या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देणे, गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी स्नेहा विश्वासराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात पती अनिकेत विश्वासराव याला सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनी साथ देण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्नी स्नेहा दिलेल्या तक्रारीवरून पती अभिनेता अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!