अजित पवार यांच्या IT कारवाई विरोधात; पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन
पिंपरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ “आमची ताकद, आमचा अभिमान अजितदादा” असे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते. हाताला काळी फित बांधली होती.
पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच
यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, समीर मासुळकर, राजू बनसोडे, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, नगरसेविका वैशाली काळभोर, निकिता कदम, पोर्णिमा सोनवणे, संगीता ताह्मणे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, काळूराम पवार, राजेंद्र साळुंखे, प्रसाद शेट्टी, प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, सारिका पवार, कविता खराडे, गंगा धेंडे आदी कार्यकर्ते आंदोलन सहभागी झाले आहेत.
अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते
“अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले. निवडणुकीच्या आधी मला ईडीची नोटीस दिली. मी बँकचा सभासदही नव्हतो. मला भाजपने ईडीची नोटीस दिली, मात्र लोकांनी भाजपला येडी ठरवली. आता अजित पवारांकडे पाहुणे पाठवले, असं म्हणत शरद पवारांनी आयकर विभागाच्या धाडसत्रावर भाष्य केलं.