दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळताच शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: दसरा मेळाव्यावरुन राज्यात शिवसेना आणि शिंदे गटातील राजकारणाला आज ब्रेक लागला आहे.  यांच्यात जोरदार राजकीय वादानंतर आता मुंबई सर्वोच्चा न्यायालयाने निर्णय देत शिवसेनेला परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेने शिंदे गटाचा आणि शिवसेनेचा अर्ज नाकारल्यानंतर शिवसेनेकडून कोर्टात धाव घेण्यात आली होती. त्यानंतर या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. या युक्तीवादानंतर न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात आली आहे. शिवसेनेला परवानगी दिल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे.

भरत गोगावले म्हणाले की, आम्ही शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली होती. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची आम्हाला परवानगी दिली असती, तर आम्हीतेथे मेळावा घेतला असता मात्र आता आम्ही बीकेसीच्या  मौदानात दसरा मेळावा साजरा करु, बीकेसीदेखील बाळासाहेबांच्या मातोश्रीजवळच आहे. तसेच कोर्टाचा निर्णय आम्ही मान्य करतो. काही काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही आमची तयारी करतो, ते त्यांची तयारी करतील, असे सुद्धा ते म्हणाले आहेत.