कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का

7

कोरेगाव: सातारा जिल्ह्यात कोरेगाव नगरपंचायती निवडणुकीतच्या पुन्हा एकदा धक्कादायक निकाल पहायला मिळत आहे. नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना 13 जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मात्र 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. हा निकाल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना आमदार महेश शिंदे पुरस्कृत कोरेगाव शहर विकास पॅनलने सर्वाधिक म्हणजेच 12 जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पॅनललने अवघ्या चार जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकत कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलची सत्ता आली आहे.

एकूण जागा – 17

शिवसेना पुरस्कृत पॅनल – 12 जागा विजयी

राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल – 4 जागा विजयी

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीतही आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला होता. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना मोठा झटका बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. तर ज्ञानदेव रांजणे विजयी झाले होते. या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.