• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, March 30, 2023

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

सर्वसाधारण योजनेत भंडारा जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्रराजकीय
On Jan 20, 2022
Share

भंडारा: सन 2022-2023  या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण योजनेतून भंडारा जिल्ह्यासाठी 157 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत आश्वस्त केले. राज्यस्तरीय बैठकीत मुंबई येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्याच्या सन 2022-23 वार्षिक योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते.

या बैठकीला आभासी पध्दतीने पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम सहभागी झाले होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी श्री श. के. बोरकर यांचेसह सर्व विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. सन 2021-22 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेमध्ये 150 कोटीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी माहे डिसेंबर अखेर 71.87 टक्के निधी खर्च झाला आहे.

जिल्हा नियोजन आराखड्यानुसार सन 2022-23 मध्ये जिल्ह्यासाठी 111.95 कोटी नियतव्यय शासनाने कळविला होता. मात्र लोकप्रतिनीधी व जिल्हा प्रशासनाच्या वाढीव निधीची मागणी विचारात घेता सर्वसाधारण योजनेमधून 157 कोटीचा निधी उपलब्ध करण्यात येईल, असे श्री. पवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हा‍ नियोजन समितीद्वारे गेल्यावर्षी केलेल्या कामाचे सादरीकरण जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

सन 2022-23 या वर्षासाठी अतिरिक्त निधीची मागणी पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केली असता कोरोना महामारीमुळे राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्याने निधी वाढविण्यात मर्यादा असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. तरीदेखील पालकमंत्री श्री. कदम यांच्या मागणीची दखल घेत 157 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

जलजीवन मिशनमध्ये निधी उपलब्ध असून पाणीपुरवठ्याची कामे करण्याचे निर्देश वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी 2020-2021 या वर्षात राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रमातून महिला बचतगटांना ई-रिक्षा उपक्रम, बहुपीक कांडप यंत्र, तसेच शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून भाजीपाला उत्पादनाकडे वळवणे, भाजीपाला क्षेत्राचा विस्तार करणे, मिनीट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत अवजारे आदी उपक्रम राबविल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

157 कोटींच्या निधी व्यतिरिक्त आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती उपयोजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, नक्षलग्रस्त भागासाठी विकास निधी आदी मिळून जिल्ह्याला सर्व योजनांचे मिळून 239 कोटी रूपये देण्यात येईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar - Home | FacebookAjit Pawar (@AjitPawarSpeaks) · TwitterChief Executive Officer Vinay MoonChief Minister Ajit PawarCollector Sandeep KadamDistrict Superintendent of Police Vasant JadhavGuardian Minister Dr. Viswajit KadamMLA Raju KaremoreProvision of Rs. 157 crore for Bhandara district in general plan - Deputy Chief Minister Ajit Pawarआमदार राजू कारेमोरेजिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधवजिल्हाधिकारी संदीप कदमपालकमंत्री डॉ. विश्वजित कदमभंडारामुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड
You might also like More from author
कोंकण

शिक्षकांची ३० हजार पदे लवकरच भरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करणार

पुणे

‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची…

महाराष्ट्र

१८ जानेवारी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना सावर्जनिक…

क्राईम

पुण्यात बड्या बिल्डरला अजित पवारांच्या फोन नंबरचा वापर करत धमकी; ६ जण ताब्यात

पुणे

पुण्यात उद्यापासून पहिली ते आठवीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय

महाराष्ट्र

अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा खोचक टोला

महाराष्ट्र

वस्त्रोद्योगाशी संबंधीत उत्पादनांवर 5 वरून 12 टक्के वाढवलेला जीएसटीची रद्द करा

मराठवाडा

गारपीट आणि अवकाळी पावसाने 12 जिल्ह्यांना झोडपले, बळीराजा हवालदिल

प. महाराष्ट्र

कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी - चिंचवड

पिंपरी चिंचवड पालिकेत शिवसेनेसोबत आघाडी करायची मानसिकता ठेवा – अजित पवार

पुणे

पुणे जिल्हा बॅंकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार बिनविरोध

महाराष्ट्र

OBC आरक्षण प्रश्न: राजेश टोपेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले….

महाराष्ट्र

अजित पवार यांच्या कामाची स्टाईल मला फार आवडते ; नवाब मलिकांनी केले कौतुक

पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का: मावस भावाच्या घरावर ईडीकडून छापा

Prev Next

Recent Posts

एजिवडे गावातील कांबळे कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न उच्च व…

Mar 30, 2023

स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि नम्र असणे हे बापट साहेबांकडून…

Mar 29, 2023

आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं –…

Mar 29, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या…

Mar 29, 2023

भाजपा – शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा,…

Mar 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक…

Mar 29, 2023

पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार…

Mar 28, 2023

कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा…

Mar 28, 2023

गिरीश खत्री मित्र परिवार आयोजित “स्वच्छतेचा नमो…

Mar 28, 2023
Prev Next 1 of 219
More Stories

शिक्षकांची ३० हजार पदे लवकरच भरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Feb 17, 2023

राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करणार

Feb 15, 2023

‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे –…

Jan 22, 2022

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे,…

Jan 15, 2022

१८ जानेवारी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Jan 14, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर