“तुमच्याकडे विविध तपास यंत्रणा आहेत ना, तुम्ही शोधू शकताय; अमृता फडणवीसांना कायंदेंचा टोला

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सध्या काहीच पत्ता नाहीय. ते काय हनिमूनला गेलेत काय? अशी खोचक टीका अमृता फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या टीकेला आता शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुम्हाला भाजपकडून आमदार व्हायचंय, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात. बरं राहिला प्रश्न देशमुखांचा तर तुमच्याकडे विविध तपास यंत्रणा तुम्ही शोधू शकताय ना”, अशा शब्दात मनीषा कायंदेंनी अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय.

मनीषा कायंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कायंदे यां म्हणाल्या की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला आहे. सामनातून भारतीय जनता पार्टीवर टीका होत असताना अमृता वहिनी मात्र अस्वस्थ होतात. आमच्याकडे तर अशी माहिती आहे की अमृता वहिनींना भाजपकडून आमदार व्हायचंय, प्रवक्ता व्हायचंय. त्यासाठी त्या भारतीय जनता पार्टीवर दबाव आणत आहेत”

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल महाविकास आघाडी सरकारण टीकास्त्र सोडले होते. त्यांनी म्हंटले होते की, ‘एक पोलीस कमिशनर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी घोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना’, अशा शब्दात देशमुख आणि सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!