सत्तारांची अजून हळद उतरायची आहे, त्यांना बोलायचं ते बोलू द्या; संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई: शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी शिवसेना व भाजप युतीबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. त्यांच्यानंतर आता खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप-शिवसेना युतीबाबत कोण बोलतंय, कुणी प्रमुख नेता बोलतोय का? हे अगोदर सर्वांनी तपासून घावे. अब्दुल सत्तार अजून शिवसेनेमध्ये नवीन आहेत, त्यांची हळद आणखी उतरायची आहे, असे म्हणत राऊत यांनी खोचक टोला लगावला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत बोलणारे जे अब्दुल सत्तर हे जे मंत्री आहेत. त्यांनी शिवसेना पक्षामध्ये फक्त 25 वर्ष पूर्ण केलेली. त्याच्याकडून जी काही विधाने केली गेली आहेत. त्यांच्या त्या विधानाला काहीच अर्थ नाही. अजून त्यांच्या अंगावरची हळद उतरायची आहे बरीचशी.

सत्तार हे शिवसेनामध्ये पंचवीस वर्षांपासून असूनही त्यांना काहीही माहीत नाही. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. अजून ते शिवसेना पक्षात नवीन आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेची हळद पूर्णपणे लागायची आहे. बोलू द्या त्यांना, जे काही बोलायचे आहे ते त्यांना बोलू द्यावे. शिवसेना पक्षातील प्रमुख लोकांपैकी दुसरे कोणी काय बोलत आहे का? असा सवाल यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!