‘पाच वेळा एकाच घरात चौकशी करणं किती योग्य, याचा विचार जनतेनंच करायला हवा’ – शरद पवार

मुंबई: केंद्राकडून काही सरकारी तपास यंत्रणाचा वापर राजकीय हेतूसाठी सतत केला जात आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सीबीआय, ईडी, आयटी आणि एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर भाजप राजकीय हेतूसाठी करत आहे, असेही शरद पवार म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या घरांवर ईडी कडून छापेमारी केली जात आहे. शंभर कोटी वसूली प्रकरणी सीबीआयकडून पाचव्यांदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापा टाकला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप व ईडीच्या कारवाईवर टीका केली. पाच वेळा एकाच घरात चौकशी कशी काय केली जाऊ शकते. वास्तविक, पाहता सर्व तपास यंत्रणांचा वापर राजकीय दृषीनं केला जात असल्याचे पाहायला मिळत असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे काम सुरु आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा टाकला. पाच वेळा एकाच घरात चौकशी करणं किती योग्य याचा विचार जनतेनंच करायला हवा.

जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांवर हल्ला झाला. यामध्ये एका पाच जवानांना वीरमरण आलं. चीनसोबत 13 वेळा बैठका घेण्यात आल्या. पण एकही बैठक यशस्वी झाली नाही. सीमेवरील सद्यास्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सीमाप्रश्नी राजकारण न करता सर्वपक्षीयांनी भूमिका घेणं गरजेचं आहे, असे शरद पवार म्हणाले. मावळ येथे झालेल्या गोळीबार प्रकरणावरही शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्त्युतर दिलं. मावळ गोळीबाराला राजकीय पक्ष नव्हे तर पोलिसच जबाबदार आहेत. येथे स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथवलं होतं, असे शरद पवार म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!