नवाब मलिकांचा थेट आरोप, आता अमृता फडणवीस म्हणतात…

मुंबई: या ग्रुपला मी देवेंद्र फडणवीसांकडे घेऊन आले. ईशा फाऊंडेशनने त्यांना घेतलं म्हणून आम्ही घेतलं. तेव्हा जयदीप राणाचा पंटरचा काही रेकॉर्ड नव्हता, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नवाब मलिकांवर पलटवार केलाय. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी अमृता फडणवीसांना लक्ष्य केलं होतं. त्यालाच आता अमृता फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलंय.

अमृता फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जयदीप राणाचं नाव गाण्यातून वगळण्यात आलं, याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना माहीत नसेल तो ड्रग्जमध्ये आहे म्हणून. रिव्हर मार्चलाही माहीत नसेल. म्हणून त्याचं नाव कट केलं असेल.

तीन चार वर्षांनी सेंट्रल एजन्सीने त्याला पकडलं. त्यांना वाटलं हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे तर त्यांनी नाव काढलं तर काय चुकीचं आहे?, असा सवालही त्यांनी केला. मलिक यांनी जाणीवपूर्वक आरोप केले. आमच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते काय एक्सपोज करणार? आमच्याकडे जमीनी नाही, साखर कारखाने नाही, त्यामुळे ते आरोप करणारच. पण आम्ही कुणाला घाबरत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

या गाण्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी झाले. मीही झाले. देवेंद्र फडणवीसही झाले. त्यानंतर रिव्हर मार्चनेही आमच्यासाठी एक गाणं बनवा, असं त्यांना सांगितलं. सचिन गुप्तांनी त्याला होकार दिला. त्यानंतर सचिन गुप्ताने दिग्दर्शनासाठी मदत केली. तर रिव्हर मार्चने गाणं तयार केलं. फुकटात गाणं तयार केलं. त्या गाण्यात कोळी समाज आणि डब्बेवाले आले. ते एक पैसा न घेता आले. मनात आलं असतं तर शाहरुख आणि सलमानलाही घेतलं असतं, असंही अमृता फडणवीस म्हणाल्यात.

Read Also :