सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक, सायबर सेलकडे तक्रार
मुंबई: राज्यात मागील काही दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक झालं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: ट्विटकरून याबाबत माहिती दिली आहे. शिवाय, याप्रकरणी फेसबुक इंडियाकडे आणि सायबर क्राईमकडे तक्रार देखील नोंदवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमिन आणि मॉडेरेटर म्हणून कुठलिही अॅक्टिव्हिटी करु शकत नाही. त्यामुळे फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला माझे अॅडमीनचे अधिकार देत पेज सुरु करावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी फेसबुककडे केलीय.
तसंच याबाबत महाराष्ट्र सायबर सेलकडे आपण रितसर तक्रार दिल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांच्या फेसबुक पेजचा अॅडमिन अॅक्सेस काढून घेण्यात आल्याचा दावा मुंडे यांनी केला आहे. त्यांनी आपलं फेसबुक पेजचा अॅक्सेस पुन्हा प्राप्त करुन देण्याची मागणी फेसबुक इंडियाकडे केली आहे.
माझे अधिकृत फेसबुक पेज @DPMunde हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत @FacebookIndia व @MahaCyber1 कडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. pic.twitter.com/CxzrPcfzC7
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 26, 2021
“माझे अधिकृत फेसबुक पेज @DPMunde हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत @FacebookIndia व @MahaCyber1 कडे रीतसर तक्रार नोंदवली आहे.” असं धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.