राज्यातील प्रत्येक दुकानाची पाटी आता मराठीतच, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई: महाराष्ट्रात मराठी भाषा वापरण्यासंदर्भातील महत्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळच्या बैठकीत घेण्यात आला.मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली.
दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती.
बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ४६.४५ चौ.मी. (५००चौ.फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या ‘निवासी’ मालमत्तांना मालमत्ता करामधून सवलत, दहा कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांनाही मराठी पाट्या लावणे बंधनकारक…यासह इतर #मंत्रिमंडळनिर्णय पाहा.#TodaysNews #GovtOfMaharashtra pic.twitter.com/gqHJcWcQxD
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 12, 2022
अखेर मंत्रीमंडळाने आज महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा आणि पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने आणि व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली. राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली आणि कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला.