गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई: देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मंगेशकर कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता दीदींना कोरोनाची लागण झाली असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत. दीदींचे वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे न्युमोनिया झाला आहे. याला कोविड न्युमोनिया असे म्हटले जाते. दरम्यान, रविवारी रात्री लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतिबाबत मुंबईच्या महापौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. रविवारी पहाटे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. तसेच, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत.

लता मंगेशकर यांचा अनेक पुरस्कारांनी सम्मान

गानकोकीळा लता मंगेशकर यांनी वयाची 92 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला. लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. 1974 मध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्डिंग केलेल्या कलाकार म्हणून स्थान दिले. त्यांनी 1948 ते 1974 या काळात 25,000 हून अधिक गाणी गायली आहेत.