एसटी कर्मचारी संपावर ठाम: राज्य सरकारची खासगी वाहतुकीला तात्पुरती परवानगी

13

मुंबई: ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. एसटी महामंडळ  बरखास्त करून राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशान्वये राज्य सरकारने समिती नेमली आहे. तरी देखील ठोस तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे नागरिकांचे आणि प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी राज्य सरकारने खासगी बस वाहतुकीला तात्पुरती परवानगी दिली आहे. प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. एसटीला राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. यानंतरही एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटीचे एकूण २६० डेपो बंद आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे या संपामुळे प्रचंड हाल झाले आहेत. या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून एक प्रसिद्धी पत्रक जारी करत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी संघटना संपावर असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी सर्व खासगी बसेस, स्कूल बस आणि कंपनीच्या मलाकीच्या बस तसेच मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची तात्पूरती परवानगी देण्यात येत आहे. मात्र ही परवानगी एसटी कर्मचारी जोपर्यंत आंदोलन मागे घेत नाही तोपर्यंत लागू असेल असे पत्र परिवहन विभागाकडून जारी करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.