आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी एका वर्षासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

14

मुंबई, दि. २४ :- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) संवर्गातून प्रवेशित झालेल्या १ हजार ६०० विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील EWS प्रमाणपत्राऐवजी केंद्र सरकारच्या नमुन्यातील EWS प्रमाणपत्र सादर केले होते. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन, केवळ या शैक्षणिक वर्षाकरिता एकवे ळची विशेष बाब विद्यार्थ्यांनी सादर केलेले केंद्र सरकारच्या नमुन्यातील EWS प्रमाणपत्र या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिले आहेत असेही मंत्री श्री. पाटील यांनी यांनी यावेळी सांगितले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.