आमची चूक झाली, सदावर्ते यांना हटवून आता दुसरे वकील एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणार कोर्टात

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या अनुशंगानं एक महत्त्वाची बैठक आज सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधींनी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा केली. प्रदीर्घ चर्चेनंतर या बैठकीबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांना तातडीनं रुजू होण्याचं आवाहन वेगवेगळ्या एसी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी केलं. इतकंच काय तर यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही निशाणा साधला.

आमची चूक झाली, आता आम्ही वकील बदल आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. त्यावर अखेर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गुणरत्न सदावर्ते यांना हटवून आता त्यांच्याऐवजी दुसरे वकील एसटी कर्मचाऱ्यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत. वकील सतीश पेंडसे यांच्याकडे आता युक्तिवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते स्वतः डिप्रेशनमध्ये आले असावेत, अशा शब्दांत यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी सदावर्ते यांना टोला लगावला.

सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा अनिल परब, शरद पवार आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत झाली. या एसी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत संपावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेनंतर कृती समितीला आश्वस्त करण्यात आलं. सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर असून त्यासोबत आता एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीन कामावर रुजू व्हाव, असं कळकळीचं आवाहन करण्यात आलंय. एकूण 22 एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!