“कामावर रुजू व्हा”; अनिल परब यांचे पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मुंबई: राज्यात गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. अखेर सरकार कडून कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आल्यानंतर आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले. मात्र विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.अखेर सरकार कडून कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे.
विलीनीकरणाबाबत सरकारची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. पगारवाढीबाबतचा लेखाजोखा देखील कालच्या पत्रकार परिषदेत मांडला आहे. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतल आहे. मागण्या मान्य झाल्यानंतर लढाई कुठेतरी थांबवायची असते , त्यामुळे काही कामगारांची कामावर यायची इच्छा आहे. त्यांना मी आवाहन करतो की उद्यापर्यंत कामावर या, त्यांनतर किती कामगार येतात यावरून पुढील काम कस करायचं याचा निर्णय होईल.
विलीनीकरण ची मागणी ही हायकोर्टाने नेमलेल्या समिती समोर आहे. त्यासाठी 12 आठवड्याचा कालावधी दिला आहे. आणि तोपर्यंत संप करणं हे एसटीला परवडणारे नाही आणि कामगारांना देखील परवडणारे नाही. त्यामुळे दोघांचे पण नुकसान होणार आहे. एसटीची अवस्था वाईट आहे. आर्थिक संकट असून देखील सरकारने ऐतिहासिक पगार वाढ केली आहे त्यामुळे कामगारांनी कामावर रुजू व्हावे असे अनिल परब यांनी म्हंटल.