‘आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय. कारण…’ : नितेश राणे भडकले

मुंबई: भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी हे विधान केल्याचं दिसून येत आहे.

’93च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं. आता त्यांचाच मुलगा 93 दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्यांबरोबर मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगतोय. खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो…’ असं ट्वीट करुन नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय.

नवाब मलिक यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आज सकाळी 10 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करताना पाच ते सहा वेळा मुन्ना यादवचं नाव घेतलं. मुन्ना यादवचं नाव घेऊन त्यांनी फडणवीसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आमचा तुम्हाला सवाल आहे की रियाझ भाटी कोण आहे.

29 ऑक्टोबरला रियाझ भाटी बनावट पासपोर्ट सोबत सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम संबंधाच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या होत्या. रियाझ भाटी सर्व कार्यक्रमात तुमच्या सोबत का दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करायचा नाही. त्यांच्या कार्यक्रमात जायचं असल्यास तपासणी केल्याशिवाय परवानगी मिळत नाही. रियाझ भाटीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढले. रियाझ भाटीसोबत तुम्ही वसुलीचं काम केलं, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.