शिवसेना हि बाळासाहेबांची शिवसेना आहे, हेच या महाराष्ट्राचे सत्य आहे आणि या सत्याचा विजय नक्कीच होईल असा आम्हाला विश्वास आहे – संजय राऊत
राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आजचा तिसरा दिवस. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. आज ठाकरे गटाकडून प्रतिवाद झाला. आज या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार कि सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार ? हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या सद्सद्विवेकबुद्धी वर आमचा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले.