एसटी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ; अनिल परब यांची घोषणा

9

मुंबई: राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात येण्याच्या मागणीलाही सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. समितीचा अहवाल आल्यावर जो निर्णय असेल तो राज्य सरकार घेणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.

तसेच कर्मचाऱ्यांच्या पहिल्या टप्प्यात ज्या कामागारांचे पगार कमी आहेत त्यांना ५ हजार तर तिसऱ्या टप्प्यात ज्या कर्मचाऱ्यांचे पगार जास्त आहे त्यांना २ हजाराची पगारवाढ कऱण्यात आली आहे. आतापर्यंत एसटीच्या इतिहासात ही सर्वात मोठी पगारवाढ करण्यात आली असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत केलेल्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबतची माहिती दिली आहे. अनिल परब म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय समितीने राज्य शासनाला दिल्यावर जो निर्णय़ असेल तो मान्य करण्यात येणार आहे. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा सुटावा यासाठी पगारवाढ करण्यात येणार आहे. ही वाढ कर्मचाऱ्यांच्या मुळ पगारात कऱण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना भत्ता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो. घरभाडे भत्ता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो तसाच दिला जातो. पगारवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जाणार असल्याचे अनिल परब म्हणाले आहेत. राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे की, जे कर्मचारी १ ते १० वर्षांच्या कॅटेगरीमध्ये आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ५ हजाराची वाढ करण्यात आली आहे. १ ते १० वर्षातील कर्मचाऱ्यांचे पगार १२८० होते त्यांना आता १७,३९५ रुपये पगार मिळणार आहे. तर ज्यांचे वेतन १७ हजार होते त्यांना २४,५९४ पगार मिळणार आहे. ही पगारवाढ आतापर्यंतची सर्वात मोठी असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.