आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरते मागे; सदाभाऊ खोत यांची घोषणा

मुंबई: राज्यात गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. अखेर सरकार कडून कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आल्यानंतर आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले. मात्र विलीनीकरणासाठी देण्यात आलेला न्यायालयीन लढा लढतच राहू असेही सदाभाऊ खोत यांनी म्हंटल.

विलिनीकरणाचा निर्णय येईपर्यंत वेतवाढीचा निर्णय सरकारने घेतला. हा आंदोलनाचा पहिला विजय आहे. दुसऱ्या बाजूला सरकारने सरकार एसटीकडे निधी वर्ग करून नियमित वेतन होणार आहे. विलिनीकरणाचा लढा सुरू असला तरी पहिला टप्पा जिंकलेला आहे. भविष्यात विलिनीकरणाची लढाई सुरूच राहिल. कामगार जेव्हा जेव्हा बोलवतील तेव्हा तेव्हा आम्ही जावू, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण यांनी लालपरी सुरू केली. त्यांनी पहिल्यांदा कराड ते मुंबई एसटी प्रवास केला होता.आज त्यांच्या स्मृतिदिनी कामगारांनी या आंदोलनावर विजय मिळवला याचा आनंद आहे असेही सदाभाऊ खोत यांनी म्हंटल.कामगार जागा झाला आहे, त्याच्यावर अन्याय केला तर तो उठू शकतो याचा अंदाज सरकारला आला असेल असेही सदाभाऊ म्हणाले.