एसटी संप, प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये, कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी – जिंतेद्र आव्हाड

8

मुंबई: एसटी मंहामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात वाढ केली आहे. मात्र, तरी देखील संप सुरुच आहे. या सगळ्या घडामोडीत राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. एसटी संप, प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये, कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी’ असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांना नेमकं म्हणायचं काय आहे? असा सवाल आता सर्वांना पडला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. हे ट्विट अत्यंत गंभीर असून या ट्विटमधून बरेच अर्थ निघत आहेत. “३५० रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून, ७०,००० कर्मचारी, कर्मचाऱ्यांची लूट, ST संप, कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी,” असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.

आव्हाड यांना नेमकं म्हणायचं काय आहे. ७० हजार कर्मचाऱ्यांकडून ३५० रुपये घेतले तर याची आकडेमोड केली असता २ कोटी ४५ लाख रुपये जमा होतात. हे पैसे कोणत्या नेत्यांनी घेतले आहेत का? ते नेते कोण आहेत? नेमकं आव्हाड यांना काय म्हणायचं आहे? असा सवाल आता सर्वांना पडला आहे.

एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात गेले १७ दिवस आंदोलन करत आहेत. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत हे आंदोलनात सहभागी होते. मात्र, सरकारने कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात वाढ केल्यानंतर पडळकर आणि खोत यांनी संपातून माघार घेतली आहे. राज्य सरकारने जी मुळ वेतनात वाढ केली आहे, हा पहिला विजय आहे. जे मिळेल ते पदरात टाकून घ्यायचं, बाकीचं नंतर घ्यायचं, असं पडळकर म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.