चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे, याचे परिणाम भोगावे लागतील – छत्रपती संभाजीराजेंचा आव्हाडांना इशारा

राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी तर जितेंद्र आव्हाड यांना थेट इशाराच दिला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी जितेंद्र आव्हाड त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना थेट इशारा दिला आहे . जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारेही नाही. मतांसाठी चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. ट्विट करत राजेंनी हा इशारा दिला आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं आय म्हणाले ?
मोघलांचा इतिहास पुस्तकातून काढणार असं तावडेंनी विधानसभेत जाहीर केलं. पणन समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. त्याच्यातून ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना.